एक्स्प्लोर
Shiv Sena MNS Joint Protest | Nashik मध्ये शिवसेना-मनसे एकत्र, 'ठाकरे बंधू'ंच्या एकीचा संदेश!
नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेचे सर्व कार्यक्रम यापुढे संयुक्तपणे होतील, असे वक्तव्य खासदार Sanjay Raut यांनी केले आहे. दोन्ही पक्षांचे मूळ आणि कुळ एकच असल्याचेही Raut यांनी यावेळी सांगितले. दोन बंधू हे शंकराचे डोळे आहेत, अशी उपमा देत Nandgaonkar यांनी ठाकरे बंधूंच्या एकीच्या आशा पल्लवित केल्या. एकीकडे ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत, तर दुसरीकडे दोन्ही पक्षांतील नेते सातत्याने संभाव्य युतीचे संकेत देत आहेत. नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेने संयुक्त मोर्चा काढत सत्ताधाऱ्यांना शह देण्याचा प्रयत्न केला. दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरांच्याच मागे जाईल, असा संदेश नाशिकने दिला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेने शहराच्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेविरोधात मोर्चा काढला. जनाक्रोश मोर्चामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. नाशिकमध्ये खुलेआम Drugs ची विक्री होते, मुख्यमंत्र्यांचे गृहखाते काय करतेय हे पाहण्यासाठी Fadnavis यांनी वेष पालटून नाशिकमध्ये यावे, असा टोला Raut यांनी लगावला. मोर्चामध्ये भ्रष्टाचार, गुन्हेगारी, Koyta Gang, जुगार आणि MD Drugs ची प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात आली.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
आणखी पाहा





















