Shashikant Shinde Satara : उमेदवारी मिळाल्यावर पहिल्यांदाच साताऱ्यात, शशिकांत शिंदेंचं जंगी स्वागत
Shashikant Shinde Satara : उमेदवारी मिळाल्यावर पहिल्यांदाच साताऱ्यात, शशिकांत शिंदेंचं जंगी स्वागत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले शशिकांत शिंदे यांना साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर ते आज प्रथमच साताऱ्यात दाखल झाले, यावेळी त्यांचे ढोल ताशा आणि तुतारीचा निनादात जंगी स्वागत करण्यात आले, यावेळी मोठी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. कार्यकर्त्यांची गर्दी आणि गाड्यांचा ताफा यामुळे पुणे बेंगलोर महामार्ग काही काळ ब्लॉक झाला होता. यावेळी शशिकांत शिंदे यांचे औक्षण करून महिलांनी स्वागत केले.माझी लढाई विचारांची आहे समोरचा उमेदवार नेमका कोण आहे हे अजून मला माहीत नाही असे म्हणत पुढचं विजन ठेवून मी निवडणुकीला सामोरे जात असल्याचं शशिकांत शिंदे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.साताऱ्याचा विकास हाच माझा ध्यास असेल असे सांगून त्यांनी उदयनराजेंवर टीका करणं टाळलं.शशिकांत शिंदे यांनी यावेळी काय म्हणाले पाहूया




















