Sangli Congress Melava : काँग्रेसचा आज मेळावा, विशाल पाटलांविरोधात काँग्रेस काय भूमिका घेणार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanglii Congress Melava : काँग्रेसचा आज मेळावा, विशाल पाटलांविरोधात काँग्रेस काय भूमिका घेणार? सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कडून सांगली जिल्ह्यातील सर्व कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावा आज पार पडतोय. या मेळाव्यात विशाल पाटील यांचे बंड आणि त्याची अपक्ष उमेदवारी आणि कारवाई बाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष असणार आहे..या मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले , पृथ्वीराजबाबा चव्हाण, बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजीत कदम, सांगली जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत आणि जिल्ह्यातील काँगेस नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सांगलीच्या भावे नाट्यगृह मध्ये हा मेळावा पार पडणार आहे.या मेळाव्यातुन कॉंग्रेस नेते मविआ आघाडीचा धर्म पाळण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देणार का आणि विशाल पाटील यांच्याबाबत काय भूमिका काँग्रेस पक्ष घेणार याकडे लक्ष असणार आहे.