Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा, मुंबई सुपरफास्ट ABP Majha 17 June 2024
पंतप्रधान मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार, ओबीसींच्या विरोधात निर्णय होत असेल तर लक्ष्णम हाकेंसोबत आंदोलनात उतरणार, छगन भुजबळांचा इशारा
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत १९व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव, अनिल परबांचा आरोप, एआरओ आणि आमच्या मतांमध्ये ६५० मतांचा फरक, परबांचा दावा'मॅक्झिमम विदर्भ', भास्कर जाधवांवर खास जबाबदारी देणार, माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती, विधानसभेच्या जागावाटपाबाबत अद्याप निर्णय नाही, नाना पटोलेंचं स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता, पवार गट मविआकडे १०० जागांचा प्रस्ताव ठेवणार.तर विधानसभेत आम्हाला जास्त जागा द्याव्यात, रोहित पवारांची मागणी
पुण्यातील विधानसभेच्या जागांवरून मविआत रस्सीखेच होण्याची शक्यता, शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही पुण्यातील ६ जागांवर दावा.