Sambhaji Nagar LIVE Accident : रील काढताना अपघात, Accelerator दाबला अन् कार थेट दरीत

Continues below advertisement

श्नेता आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे (वय 25 रा.हनुमान नगर)  हे छत्रपतीसंभाजीनगर   येथून  सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले.  या ठिकाणी मोबाईलवर रिल्स बनवतांना तिने मित्राला सांगितले की,  मीपण कार चालवून बघते. रिव्हर्स गिअर पडून,एक्सलेटरवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन  खाली गेली यामध्ये या युवतीचा मृत्यू झाला. सुलीभंजन येथील दत्त मंदिराराचा परिसर विहंगम असून,पावसाळ्यात तो निसर्ग सौंदर्यांने अधिक खुलतो त्यामुळे भाविक ,पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. अशातच हे दोघेजण गुरुवारी (ता.17 जून) फिरायला आले. मोबाईलवर रिल्स बनवित असताना घात झाला. मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तर ही घटना घडली नसती अशी चर्चा होती. 


सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या फार आहे. काहीतरी स्टंट करायचा किंवा हुल्लडबाजी करुन प्रसिद्ध होण्याचं फॅड वाढत आहे. त्यामुळे अनेक रिल्स स्टार वेगवेगळे स्टंट करतात. अनेकदा जीवाला धोकादेखील निर्माण होऊ शकतो हे माहित असूनही अनेक लोक प्रसिद्धीसाठी असे घातक असणारे रिल्स करतात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram