Sambhajiraje Chhatrapati Hunger Strike : उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी खासदार संभाजीराजेंना अशक्तपणा
Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे, मात्र त्यांनी औषधं घ्यायला नकार दिला आहे. संभाजीराजे यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की, 60 तास झालेत त्यांना आमरण उपोषण करत आहेत. त्यांचं शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते उपोषणावर असल्यानं त्यांनी यासंदर्भात नकार दिला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.























