ABP Majha Diwali Ank : रितेश आणि जिनिलिया देशमुख यांची ABP Majha च्या दिवाळी अंकाला शुभेच्छा
आजचा दिवस एबीपी माझासाठी अत्यंत विशेष आणि खास आहे. टेलिव्हिजन आणि डिजीटल विश्वात आजवर आम्ही तुम्हा प्रेक्षकांच्या साथीनं अनेक नवेप्रयोग केलेत. आपल्या आवडी निवडी जपत गेल्या 14 वर्षांच्या प्रवासात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेती, मनोरंजन, क्रीडा थोडक्यातआपल्या सर्वांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवले. आज या प्रवासाचा पुढचा टप्पा आम्ही सुरु करतोय माझाच्या पहिल्या दिवाळी अंकासोबत. या दरम्यान, रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी माझाच्या दिवाळी अंकाला शुभेच्छा दिल्या आहेत. हा अंक वाचण्यासाठी आतूर असल्याचंही रितेश देशमुखा यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या




















