Monsoon | मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणार! 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान सर्वत्र पुन्हा पाऊस
मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणार, वातावरण बदलांमुळे सलग तिसऱ्या वर्षी परतीच्या पावसाला विलंब. सप्टेंबर मध्यानंतर मान्सून माघारी फिरत असतो. मात्र, यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे पाऊस लांबण्याची चिन्ह. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता, देशाच्या पूर्व व मध्य भागात सोमवारपासून पावसाचे प्रमाण वाढणार. 20 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार प्रामुख्याने विदर्भ क्षेत्रात सर्वत्र पावसाचा अंदाज व्यक्त. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात देखील पावसाचा अंदाज. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यात सर्वत्र पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता.





















