MNS Banner on Hindi Compulsion : काय सालं सरकार आहे!मराठी लोकांना हिंदी सक्ती करतंय, मनसेची बॅनरबाजी
Raj Thackeray on Hindi : दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात (Hindi imposition in NPE) हिंदी लादण्याचा डाव सुरु झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही (National Education Policy controversy) सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकणे सक्तीचे असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS on education policy) अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray NPE statement) राज्य सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही, आवाहनाला आव्हान समजणार असाल, तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ असल्याचा गर्भित इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
साहेब फक्त ठाम राहा, बदलू नका
पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मांडलेल्या मुद्यांचे महाराष्ट्रात सोशल मीडियातून जोरदार स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर आता हिंदी लादण्यावर (Opposition to Hindi in Maharashtra) त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं सोशल मीडियातून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. राज यांच्या निवेदनाला फेसबुक आणि ट्विटरवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. साहेब फक्त ठाम राहा, बदलू नका, अशी साद घालण्यात आली आहे. सर्व पक्ष मताच्या लाचारीपोटी शेपूट घालून बसले आहेत, आम्हाला फक्त तुमच्याकडून अपेक्षा आहे, अशीही त्यांच्या पोस्टवर कमेंट करण्यात आली आहे.























