Rahul Narwekar MLA Disqualification : शिंदे गट हीच खरी शिवसेना! राहुल नार्वेकरांचा ठाकरेंना दणका
MLA Disqualification Case: मुंबई : गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या (Maharashtra News) जनतेनं न भूतो न भविष्यती असे एक ना अनेक बदल अनुभवले आहेत. राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी घडल्या. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. आज म्हणजेच, 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना आमदार (Shiv Sena MLA Disqualification Case) अपात्रता सुनावणीचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं असून आमदारांचीच नाहीतर संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली आहे.





















