Pune Share Market Vastav EP 63 : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली माजी सैनिकांना गंडा
Pune Share Market Vastav EP 63 : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली माजी सैनिकांना गंडा
शेअर बाजारात गुंतवणूक करुन अधिक परतावा मिळवून देतो अशी बतावणी करून सैन्यातुन सेवानिवृत्त झालेल्या जवानांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आलीय. फसवणूक झालेल्या ३१३ जवानांनी आतापर्यंत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून फसवणूक झालेल्या माजी सैनिकांची संख्या अधिक असून या घोटाळ्याची व्याप्ती शेंकडों कोटी रुपयांमध्ये असल्याच्या या माजी सैनिकांचा दावा आहे. ज्याने या माजी सैनिकांची फसवणूक केलीय तो सुरेश गाडीवड्डार हा देखील माजी सैनिक असुन गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेश गाडीवड्डार आणि त्याच्या कंपनीतील साथीदार फरार झालेत. आयुष्यभराची कमाई गमाऊन बसलेल्या या माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना यामुळे जगणं अवघड झालंय.




















