एक्स्प्लोर
Pune Land Deal: 'जर एका भागीदारावर गुन्हा, तर ९९% मालकी असलेल्या पार्थ पवारांवर का नाही?'
पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे व्यावसायिक भागीदार दिग्विजय पाटील, पॉवर ऑफ ॲटर्नी धारक शीतल तेजवानी आणि निलंबित सहदुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी 'जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरा भागीदार असलेल्या पार्थ यांच्यावर गुन्हा का नाही?' असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी (Amadea Enterprises LLP) या कंपनीमार्फत झालेल्या या व्यवहारात शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुमारे १८०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली ४० एकर जमीन फक्त ३०० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली आणि त्यावर जवळपास ६ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवल्याची फिर्याद बावधन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. या कंपनीत पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
बातम्या
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement























