Prithviraj Chavan on PM Modi : मोदींचा बॅलन्स बिघडलाय, त्यांना उपचाराची गरज : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला, तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केलं आहे. मोदींच्या या वक्तव्याची राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखील मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जगात महात्मा गांधी यांचे किती महत्व आहे, हे मोदींना माहिती नाही . त्यांचे वक्तव्य म्हणजे देशाचे दुर्दैव, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पंतप्रधान मोदींचा संतुलन बिघडले आहे. काय वाटेल ते बोलणे सुरु आहे . त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर राग काढला. जगात महात्मा गांधी यांचे महत्व मोदींना माहिती नाही . त्यांचे वक्तव्य म्हणजे देशाचे दुर्दैव आहे.
महाराष्ट्रमध्ये भ्रष्टाचार सरकार कार्यरत : पृथ्वीराज चव्हाण
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरावर देखील पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रमध्ये भ्रष्टाचार सरकार कार्यरत आहेत. अधिकारी पैसे देऊन खुर्चीवर बसलेत. भ्रष्टाचार करून हे सरकार सत्तेत आले आहे. श्रीमंत लोकांसाठी वेगळा कायदा सुरु आहे पण जनता आता स्वतः न्याय देईल. हे सरकार जनता उलथावून टाकेल, असे देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.