"बेछूट आरोपांमुळे व्यवसायात प्रचंड अडचणी,BJP सोबत जाण्याचा विचार अजूनही नाहीच": Pratap Sarnaik EXCLUSIVE
ठाणे : मी आधी पासून व्यवसायात आहे, बँक आता कर्ज देत नाहीत, माझे भागीदार आता घाबरतात, ग्राहक आता येत नाही माझे फ्लॅट विकत घ्यायला, असे अनेक परिणाम यामुळे होतात, राजकीय, व्यावसायिक, आणि पर्सनल देखील, अशावेळी जवळचे मित्र लांब पळतात, लांबचे कधीतरी जवळ येतात, असे दिवस बघायला मिळतात.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट झाल्यानंतर 9 जूनला मी पत्र लिहिले, भाजप सोबत जावे यावर, मी जे म्हणालो त्या माझ्या भावना होत्या, त्यानंतर खूप पाऊस पडून गेलाय, वादळे आली, आता ती गोष्ट संपली, माझी त्यानंतर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली, त्यामुळे आता ती गोष्ट नाही वाटत, अशा व्यथा शिवसेना आमदार प्रताप यांनी माझाच्या मुलाखतीत व्यक्त केल्या.





















