PM Modi In Maharashtra : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' विकासकामांचं लोकार्पण
मुंबई: महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज 30 हजार 500 कोटींच्या विकासकामांची भेट महाराष्ट्राला देणार आहेत. ज्याचं स्वरूप सागरी सेतू ते रेल्वेचं जाळं असं आहे. ज्यातून महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती आणि दळणवळणाला गती मिळणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याची (PM Modi in Nashik) वेळ बदलली आहे. दुपारी 12.15 ऐवजी मोदी सकाळी 10.15 वाजता नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता रोड शो सुरू होईल. 2 वाजेच्या सुमारास मोदी नाशिकहून मुंबईकडे प्रयाण करतील. सकाळी सव्वादहा वाजता मोदींचं नाशिकमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांचा रोड शो (PM Modi Road Show) होईल, त्यानंतर ते काळाराम मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर ते राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम आटोपल्यावर ते मुंबईला रवाना होतील. मोदी मुंबईत जवळपास 30 हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, बेलापूर-पेंधर नवी मुंबई मेट्रो-1चं औपचारिक उद्घाटन, सीवूड्स-बेलापूर-उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे.
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)