Palghar Dhamni Dam | पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस! धामणी धरण 100 टक्के भरलं
पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून चांगला पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील मोठी पाणी क्षमता असलेली धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 75.56 टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी 113.60 मीटर झाली असून धरणातील पाणीसाठा 208. 815 दशलक्ष घनमीटर झाला आहे. त्यामुळे आज दुपारी 12.30 वाजता या धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात येणार असून या धरणांमधून 3283 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदी द्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
याच धरणामधून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो त्यामुळे या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
तर आजही पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर असून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे.
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)