एक्स्प्लोर
Oath Taking Ceremony | शपथविधीसोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात, नितीन देसाईंच्या कल्पनेतून साकारला सेट | ABP Majha
उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला आज (28 नोव्हेंबर) नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाकरे घराण्यातली पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. शिवसेना आज याठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानिमित्ताने शहरात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर महाविकास आघाडीचे नेते झळकले आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी भव्य सेट उभारण्यात आला आहे. हा सेट कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या कल्पनेतून उभारला आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion





















