Nitesh Rane Exclusive : सांगलीतल्या 'त्या' वक्तव्यावर नितेश राणे ठाम
Nitesh Rane Exclusive : सांगलीतल्या 'त्या' वक्तव्यावर नितेश राणे ठाम हिंदु समाजाच्या मुलींसोबत लवजिहादच्या घटना होतात तेव्हा पोलिस तिच्या आईवडलांना विचारतात की ही मुलगी तुमचीच आहे का - त्यावर माझा संताप झाला माझा पूर्ण पोलिस अधिकाऱ्यांवर राग नाही... काही पोलिस असे लव जिहाद, लँड जिहादाच्या आरोपींना मदत करतात आणि त्यांच्यामुळे संपूर्ण पोलिस खातं , गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बदनाम होतात काल मी पलूसमधे होतो, तेव्हा तिच्या आई-वडलांची आपबिती सांगितली..तिच्या आई-वडलांनी १५ दिवस खेटा घातल्या, त्यानंतर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी दखल घेतल्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रोसिजर सुरू झाली सगळे कायदे काय आम्ही पाळायचे का, त्या पोलिसांना काही इशारा तर दिला पाहिजे ना.. समाजामधे काही पोलिस अधिकाऱ्यांविरोधात रोष आहे, तोच मी व्यक्त केला..काही अधिकारी हिंदुचा विरोध करणारे आहेत.. काही अधिकारी जिहाद्यांना मदत करतात..त्यांच्यामुळे संपूर्ण खातं बदनाम होऊ नये म्हणून मी भूमिका घेतली आमचं सरकार हिंदुत्वावाद्यांचं सरकार आहे, त्यामुळे आमच्या राज्यात हिंदु सुरक्षित राहावे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी बोलतो.