Narendra Mehta Vote in Graduate Election : भाजपच्या आठवी पास माजी आमदाराचं पदवीधरला मतदान?
Narendra Mehta Vote in Graduate Election : भाजपच्या आठवी पास माजी आमदाराचं पदवीधरला मतदान?
मिरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान केलं. मेहतांनी फेसबुक पोस्टवर हाताच्या बोटाची शाई दाखवत मतदान केल्याचा फोटो पोस्ट केला. माञ पालिका आणि आमदारकीच्या निवडणूकीत सादर केलेल्या शपथपञात नरेंद्र मेहता यांनी आपलं शिक्षण आठवी पास झाल्याचं लिहलं होतं. त्यामुळे आठवी पास असलेल्या मेहता यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत मतदान केलं कसं असा सवाल उपस्थित झालाय. मात्र यावर आता नरेंद्र मेहतांनी स्पष्टीकरण दिलंय. पत्नीने मतदान केलं. मी ही तिथेच उपस्थित होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी फोटो काढण्यासाठी पत्नीसह उभं केलं आणि बोट दाखवण्यास सांगितलं, आपण मतदान केलेलं नाही अशी माहिती त्यांनी एबीपी माझाला दिलीय.























