MVA Leader on Sanjay Raut : संजय राऊतांवर 'मविआ'मधील नेत्यांची खरपूस टीका
महाविकास आघाडी बनवण्यात जे बिनीचे शिलेदार होते, संजय राऊत त्यातीलच एक. पण आता ते टिकेचे धनी ठरलेत. त्यांच्या सामनातील अग्रलेखावरून ते सत्ताधाऱ्यांवर टीकेचं अस्र सोडतातच. पण गेले काही दिवस त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाही लक्ष्य करायला सुरूवात केलीय. हे कमी म्हणून की आता त्यांनी खुद्द शरद पवारांवर लेखणीचा आसूड ओढल्याने त्यांच्यावर राष्ट्रवादीने पलटवार केलाय. काही दिवसापूर्वी त्यांनी अजित पवारांना डिवचले होते. तर काँग्रेसचे नाना पटोलेंनाही डिवचले होते. त्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे घेत असताना संजय राऊतांच्या लेखणीमुळे ठाकरे अडचणीत आल्याचं चित्र आहे. आणि संजय राऊत महाविकास आघाडीचे व्हिलन ठरतील की काय, अशीही स्थिती निर्माण झालीय.





















