मुंबईत Shivaji Park परिसरातील नागरिक, क्लब सदस्य आणि खेळाडूंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
abp majha web team
Updated at:
20 Feb 2022 10:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत शिवाजी पार्क परिसरातील नागरिक, क्लब सदस्य आणि खेळाडूंनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. पालिकेकडून शिवाजी पार्क मैदानात सुशोभिकरणाचं काम सुरु आहे. हे काम सुरू असतानाच शिवाजी पार्क मैदानाच्या मधोमध मोठ्या प्रमाणात खडी टाकून रस्ता बनवण्यात आलाय. याला मनसे आणि स्थानिकांनी आक्षेप घेतलाय. सुशोभिकरणाला विरोध नसून मैदानात कुठल्याही कारणास्तव खडी नको अशी भूमिका मनसेने घेतलीय. तर हे काम करताना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तूर्तास हे काम थांबवण्यात आलंय.