Mumbai Metro : मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चं लोकार्पण, पहिल्या टप्पयातील स्थानकं कोणती?
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकार मुंबईकरांना मोठी भेट देणार आहे. बहुप्रतिक्षित मेट्रो २ए आणि मेट्रो ७ या मार्गिकाच्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. या दोन्ही मेट्रो मार्गिका सुरु झाल्यानंतर मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मात्र या मेट्रोच्या उद्घाटानाआधी श्रेयवादाची लढाई रंगलीय. मुंबईत ठिकठिकाणी भाजपनं बॅनरबाजी केलीय. काम केलंय, मुंबईने पाहिलंय असा दावा भाजपने केलाय. तर तिकडे लोकर्पण सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.
महत्त्वाच्या बातम्या


















