Mhada Lok Sabha : माढ्यामध्ये भाजप आणि अजित पवार गटात प्रचंड मतभेद
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 05:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMhada Lok Sabha : माढ्यामध्ये भाजप आणि अजित पवार गटात प्रचंड मतभेद
माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार गटाच्या नेत्यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. निंबाळकर आणि गोरे हे आपल्याच नेत्यांना त्रास देतात, त्यामुळे त्यांचं काम करणं आम्हाला शक्य नाही अशी थेट भूमिका या नेत्यांनी अजित पवारांसमोर मांडली. मात्र असं असलं करी महायुतीचं काम करावंच लागेल अशी सूचना अजित पवारांनी दिली. दरम्यान, माढ्यातील या अंतर्गत वादावर चर्चा करण्यासाठी अजित पवार लवकरच देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळतंय.