Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब धनगर-मुस्लिम समाजासह इतर समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागला पाहिजे. मोठा भाऊ म्हणून मराठा समाज त्यात पुढाकार घेणार असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे म्हणाले आहेत. धाराशिव शहरात आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता रॅली काढण्यात आली, यावेळी ते बोलत होते. ओबीसी समाजातील अनेकांना माझ्या विरोधात तयार केले आहे. भुजबळ यांचा डाव लोकांनी ओळखलाय. त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण होणार नाही. सर्व जाती धर्मातील लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत. त्यांचेही अनेक विषय आहेत. राजकारण्यांनी प्रत्येकाचा विषय सोडवला पाहिजे असे म्हणत मुस्लिम,धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही प्रलंबित आहे. ही खेदाची बाब आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, मंगळवारी लातूरमध्ये झालेल्या शांतता रॅलीनंतर आज ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या तरुणांना भेटण्यासाठी ते गेले होते. यावेळी धनगर मराठा एकजूटीचा विजय असो अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या. मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी सर्वतोपरी मदत करणार- मनोज जरांगे धाराशिव शहरातील हजरत शमशुद्दीन गाझी दर्गाला मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी चादर चढवली. विविध पक्षातील मुस्लिम समाज बांधव आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येत पाठिंबाचे पत्र मनोज जरांगे पाटील यांना दिले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयाला त्यांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी मुस्लिम समाजातही आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दिले.