Manipur मध्ये अजूनही काही विद्यार्थी अडकले, विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात चर्चा करणार
मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला असून तेथे फसलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलंय. मणिपूर राज्यातील इंफाळ येथे शिक्षण घेत असलेल्या सांगलीतल्या विद्यार्थ्याची परिस्थिती ऐकून शरद पवारांनी तत्काळ तेथील राज्यपालांना कळवले आणि जलद गतीने सूत्रे हालली आणि मुलं सुखरूप सुरक्षित ठिकाणी दाखल झाली. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रचंड अवस्थता पसरली होती. अशा परिस्थितीतही शरद पवार यांनी आपल्या मुलांसाठी तात्काळ फोन करून मुलांचे जीव वाचवल्याबद्दल पालकांनी पवारांचे आभार मानलेत. तर मणिपूर येथील शैक्षणिक संस्थेत अजूनही काही विद्यार्थी अडकलेले आहेत यासंदर्भात मुख्यमँत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
असल्याची माहिती शरद पवारांनी दिलीये.
महत्त्वाच्या बातम्या























