Maharashtra : उस्मानाबादच्या कवठे गावात Yogendra Yadav आणि Rakesh Tikait यांचा सन्मान ABP Majha
दिल्लीतल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात सहभागी शेतकरी नेत्यांचा सन्मान महाराष्ट्रातल्या एका गावाने आज राजधानीत केला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कवठे गावातील शेतकरी विजय उत्सव समितीच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली योगेंद्र यादव आणि राकेश टिकेत या शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला... महाराष्ट्रातील उस्मानाबादचे शेतकरी नेते विनायक पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी कार्यक्रमात शेतकरी आंदोलनात बलिदान दिलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली... या कार्यक्रमाला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.


















