(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai : दुकानांवरील पाट्या उद्यापासून मराठीत दिसणार? पाट्या बदलण्याची मुदत संपली ABP Majha
मुंबई महापालिकेनं दुकानं आणि आस्थापनांवर ठळक मराठीत पाट्या लावण्यासाठी दिलेल्या मुदतीचा आजचा अखेरचा दिवस होता. आता मुंबई महापालिकेकडून पुढच्या आठवड्यापासून आपल्या हद्दीतल्या दुकानांचं आणि आस्थापनांचं सर्वेक्षण करण्यात येईल.त्यानंतर ठळक मराठीत पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाई सुरु होईल. दुकानांवरील पाट्या ठळक मराठीत असाव्यात असा निर्णय राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतल्या दुकानांना आणि आस्थापनांना आपल्या पाट्यांवरची नावं ठळक मराठीत करून घेण्यासाठी 31 मेची मुदत दिली होती. पण अजूनही अनेक दुकानं आणि आस्थापनांवर इंग्रजीच पाट्या झळकतायत. त्यामुळं मुंबईतील साडेचार लाख दुकानं मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत. या दुकानांच्या फलकावर ठळक मराठीत नाव नसल्यास कायद्यानुसार, त्या दुकानांवर मुंबई महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे.