Mahamudde Mumbai Highway : प्रवास उपेक्षितच, मुंबई-अहमदाबाद महामार्गाची अवस्था पाहा
Mahamudde Mumbai Highway : प्रवास उपेक्षितच, मुंबई-अहमदाबाद महामार्गाची अवस्था पाहा
आपली मुंबई ही खरं तर देशाची आर्थिक राजधानी आहे. पण शेजारच्या गुजरातमधून मुंबईत दाखल होण्यासाठीचा जो महामार्ग आहे, त्याला वाहतूक कोंडीची राजधानी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मुंबई-अहमदाबाद मार्गावर कायम वाहतूक कोंडी पाहायला मिळते. बरं ही कोंडी साधीसुधी नसते बरं का. कधी एक तास, कधी दोन तास, तर कधी कधी चार चार आणि सहा सहा तास त्या वाहतूक कोंडीत अडकून पडायला होतं. मुंबईत कामासाठी येणारे हजारो लोक आणि कोट्यवधींचा माल या वाहतूक कोंडीत अडकून पडतो. त्यामुळं किती मोठं नुकसान होतं याची कल्पनाही न केलेली बरी. गेल्या काही वर्षांपासून मुंबई किंवा ठाण्याहून वसई, विरार, सुरत, अहमदाबाद किंवा पुढे राजस्थानात जायचं असेल तर प्रचंड टेन्शन येतं. नेमकी काय आहेत या वाहतूक कोंडीची कारणं? या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण आहे? आणि त्यावर काय उपाय आहे?