(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratnagiri Lockdown : रत्नागिरीत आजपासून 9 जूनपर्यंत लॉकडाऊन; खासगी, सरकारी वाहतूक बंद
कोरोना साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी यांनी केली आहे. आज अर्थात 3 जूनपासून सुरू होणार हा लॉकडाऊन 9 जूनपर्यंत असणार आहे.या कालावधीमध्ये सर्व प्रकारची दुकानं आणि आस्थापनं बंद राहणार असून केवळ 11 वाजेपर्यंत दुधाच्या होम डिलिव्हरीचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून जिल्हा प्रवेशासाठी ई पास अनिवार्य करण्यात आलेला आहे. शिवाय, एसटी, सरकारी आणि खासगी वाहतूक देखील या कालावधीमध्ये बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी एसटी सेवा सुरू राहिल. तर, शेतकऱ्यांकरता आणि शेती संबंधित कामकाजाकरता बँका आणि वित्तीयसंस्था यांचं कामकाज 2 वाजेपर्यंत सुरू राहणार असून यावेळी केवळ 10 टक्के कर्मतारी हजर राहतील. तर पेट्रोल पंप 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार असून हायवेवरील पंप मात्र 24 तास मालवाहतुकीसाठी सुरू राहतील.