(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur : अनोख्या पद्धतीने मातृभूमीला वंदन, 20000 झाडांच्या साक्षीने झेंडावंदन सयाजी शिंदेंचा उपक्रम
सह्याद्री देवराईचे प्रमुख सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेतून लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि चाकूर तालुक्यामध्ये मागील काही वर्षांपासून वृक्ष लागवडीचे काम जोमात सुरू आहे. आज स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून उदगीर तालुक्यातील नागराळ येथे मालराना वर लावलेल्या 20 हजार झाडाच्या साक्षीने झेंडावंदन करण्यात आले . यावेळी प्रत्येका गावात ही चळवळ सक्रिय करण्यासाठी कटिबद्ध राहू असा संकल्प करण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून सयाजी शिंदे हे जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रामवाडी झरी शिवारात सह्यादी देवराई च्या तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आलेल्या प्रकल्पास भेट दिली. यावेळी ह्या भागात लावण्यात आलेले 26 हजार पेक्षा अधिक झाडे उत्तम वाढलेली पहावयास मिळत आहेत. त्या पासून प्रेरणा घेउन नागराळ या गावाच्या शिवारात 20 हजार झाडे लावण्यात आली होती. ती ही उत्तम बहरली आहेत, या ठिकाणी आज गावकऱ्यांसोबत सयाजी शिंदे यांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. या कार्यक्रमकसाठी राज्यमंत्री संजय बनसोडे,बसवराज पाटील नागराळकर यांच्या सह असंख्य वृक्ष प्रेमी हजर होते.