Ladki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLadki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या (CM Ladki Bahin Yojna) अंमलबजावणीसंदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी एक मागणी केली आहे. राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना (Muslim Women) या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' एका उदात्त हेतूने सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सक्षम होतील. मात्र, राज्य सरकारने या योजनेसाठी डोमिसाईल प्रमाणपत्राची घातलेली अट गरजेची आहे. डोमिसाईल प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास राज्याबाहेरील लोक याचा फायदा घेतील, असे मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.