Kolhapur : पन्हाळा गडावरील दरड कोसळू लागली, मंगळवार पेठ गावातील नागरिक चिंतेत
कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक असा पन्हाळगड यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा ढासळतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारण गेल्या वर्षी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती अगदी त्याच्याच बाजूला या वर्षी देखील दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे पन्हाळगडच्या पायथ्याशी असलेल्या मंगळवार पेठ गावातील नागरिक हे भीतीच्या छायेखाली आहेत. गेल्या वर्षी दरड कोसळल्यानंतर अत्याधुनिक पद्धतीने बांधकाम केले. काही दिवसांपूर्वीच या मार्गावरून वाहतूक सुरू झाली..मात्र तोपर्यंत या बांधकामाच्या बाजूलाच पुन्हा एकदा दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे...याकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशा पद्धतीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
