भ्रष्टाचाराचा 'Auditor'...Charted Accountant ते भाजपचे आक्रमक नेते Kirit Somaiya
हसन मुश्रीफांमुळे मला अंबाबाईचं दर्शन करता आलं नाही. ठाकरे सरकार हे घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणारं सरकार आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. पोलिसांनी मला कोणत्या आदेशाअंतर्गत मला गणेश विसर्जनापासून रोखलं. मला काल सहा तास कोंडून ठेवण्यात आलं. मी हात जोडून विनंती केली की ऑर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो पण मला अडवलं गेलं, असंही ते म्हणाले. सीएसएमटी स्टेशनवर मला पोलिसांनी धक्काबुक्की देखील केली. मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मला पोलिसांनी दाखवले, असंही सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्विकारावी, असं ते म्हणाले. सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही, असंही ते म्हणाले. पोलिसांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले. माझ्यावर हल्ला व्हावा ही सरकारची इच्छा आहे का? असा सवालही ते म्हणाले.
Charted Accountant ते भाजपचे आक्रमक नेते Kirit Somaiya यांचा प्रवास