ISIS Accused Arrested : आयसिसच्या 4 आरोपींना अटक, NIAची मुंबई, पुणे, ठाण्यात कारवाई Abp Majha
राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच NIA ने सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली कारवाई करून आयसिसच्या चार आरोपींना अटक केली. गंभीर बाब म्हणजे याचा उल्लेख NIA ने महाराष्ट्र मॉड्यूल असा केलाय. एनआयएने सोमवारी सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी याला मुंबईतील नागपाड्यातून अटक केली. जुबेर नूर मोहम्मद शेख याला पुण्यातील कोंढवा भागातून अटक केली. आणि शरजील शेख तसेच झुल्फिकार अली बडोदावाला यांना ठाण्यातील पडघा येथून अटक करण्यात आलीय. 28 जून 2023 रोजी NIA केलेल्या या कारवाईत आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली. तेव्हा इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयसिस संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.



















