Airbase In Pakistan : पाकिस्तानच्या एअरबेसवर क्षेपणास्त्र मारा, एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराख
Airbase In Pakistan : पाकिस्तानच्या एअरबेसवर क्षेपणास्त्र मारा, एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराख
भारतावर करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे. भारताकडून आता केवळ पाकिस्तानच्या (Pakistan) हल्ल्यांपासून फक्त संरक्षणाची रणनीती न अवलंबता नुकसान होईल, असे मोठे प्रतिहल्ले करण्यास सुरुवात झली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान नरमताना दिसत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी यासंर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आम्हाला युद्ध नको शांती हवी, असे वक्तव्य इशाक दार (Ishaq Dar) यांनी केले आहे.
जर भारताने हल्ले थांबवले तर आम्हीही थांबू. आम्हाला विनाश नको, आम्हाला निधीचा अपव्यय नको. जर त्यांनी थांबवले तर आम्हीही थांबू.पाकिस्तानला नेहमीच शांतता हवी होती. जर भारताने या क्षणी थांबले तर आम्हीही शांततेचा विचार करू आणि बदला घेणार नाही किंवा काहीही करणार नाही.आम्हाला खरोखर शांतता हवी आहे, असे इशाक दार यांनी म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इशाक दार यांनी भारताविरोध वक्तव्य करुन वातावरण तापवले होते. मात्र, आता त्यांच इशाक दार यांनी, 'आम्हाला आता लढायचं नाही, भारत थांबला तर आम्ही थांबू', अशी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.























