Udayanraje Bhosale | महाराजांचा अपमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता - खासदार उदयनराजे भोसले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी दिल्ली : "छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही," अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते उदयनराजे यांनी दिली. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली. कुठल्याही प्रकारे महाराजांचा अपमान झाला ही. याच्याएवढी हास्यास्पद गोष्ट असू शकत नाही, असंही उदयनराजे म्हणाले.