एक्स्प्लोर

Husband Build Wife Temple : पत्नीने सहजीवनाचा प्रवास अर्ध्यावर सोडला, पतीनं मंदिर उभारलं

पत्नीने सहजीवनाचा प्रवास अर्ध्यावर  सोडल्यावर पतीला धक्का बसला आणि पत्नीची  सदैव आठवण राहावी यासाठी बेळगावात एकाने आपल्या पत्नीचे मंदिर उभारले आहे.  बेळगाव येथील गँगवाडी येथील माजी नगरसेविका मैनाबाई चौगुले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पत्नीच्या अकाली निधनाचा पती शिवा चौगुले याना धक्का बसला.पत्नीची तीस वर्षे साथ मिळाल्या नंतर अचानक तिचे निधन झाल्यामुळे शिवा चौगुले यांनी एकाकी पडल्यासारखे झाले. मैनाबाई चौगुले यांचे माहेर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणगले हे गाव.विवाह झाल्यानंतर त्या बेळगावला आल्या.पती शिवा चौगुले हे समाजसेवक आणि गोरगरिबांना नेहमी मदत करणारे व्यक्तिमत्व.त्यामुळे मैनाबाई यांना त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहायला लावले.निवडणुकीत त्या निवडून आल्या.नगरसेविका म्हणून त्यांनी आपल्या प्रभागात अनेक विकासकामे राबवून जनतेची मने जिंकली.अनेक मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत देखील कोणताही गाजावाजा न करता केली.त्यामुळे मैनाबाई यांचे अकाली निधन केवळ घराच्या मंडळींना नव्हे तर प्रभागातील जनतेला देखील चुटपुट लावून गेले.पत्नीचा सदैव आपल्या समवेत सहवास रहावा म्हणून शिवा चौगुले यांनी आपल्या पत्नीची मूर्ती करून मंदिर उभारण्याचे ठरवले.बेळगावातील मुर्तीकाराने तयार केलेली मूर्ती वाजतगाजत आणली.घरात मंदिर उभारून मूर्तीची प्रतिष्ठापना केली.दररोज सकाळी मूर्तीची पूजा करून हार घालून तिची आरती शिवा करतात.सायंकाळी देखील दिवाबत्ती करून आरती करण्यात येते.गोरगरीब जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी आणि गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून मैनाबाई चौगुले सदैव प्रयत्नशील होत्या.त्यांचे हे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवा चौगुले यांनी हॉस्पिटल आणि शाळा भविष्यात सुरू करण्याची योजना आखली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Embed widget