Hemant Godse : हेंमत गोडसे यांनी घेतली मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
नाशिकच्या जागेवरून महायुतीत सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु असून या जागेचा गुंता अजूनही सुटलेला नाही. गेल्या तिन आठवड्यात हेमंत गोडसेंनी 9 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली असून आज देखिल पुन्हा त्यांनी ठाणे गाठले आहे, उमेदवारी मलाच मिळेल असा विश्वास ते व्यक्त करतायत तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत बाबासाहेबांना अभिवादन केले असून मतदारांच्या ते गाठीभेटी घेतल्या आहेत. भुजबळांकडून एक प्रकारे प्रचाराची सुरुवात झाल्याची चर्चा आता नाशिकमध्ये रंगू लागली आहे.




















