Gyanvapi : ज्ञानवापी - मशिद की शिवलिंग? मशिदीचा वाद वरच्या कोर्टात ABP Majha
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याचा दावा हिंदू पक्षानं केल्यानंतर संबंधित जागा सील करण्याचे आदेश वाराणसीच्या कोर्टानं दिलेत. हा वाद आता वरच्या कोर्टात गेला आहे. ज्ञानवापीच्या सर्व्हेलाच आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर मशिदीतील जागा संरक्षित करण्याच्या वाराणसी कोर्टाच्या आदेशाला मुस्लिम पक्ष आज हायकोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे. ज्ञानव्यापीतील सर्व्हेचं काम काल पूर्ण झालं. या पाहणीत शिवलिंग आढळल्याचा दावा करत हिंदू पक्ष वाराणसीच्या कोर्टात पोहोचला आणि या ठिकाणी संरक्षण देण्याची मागणी केली. कोर्टानं तातडीनं आदेश देत संबंधित ठिकाण सील करण्यास सांगितलं. त्यानंतरच वाराणसी कोर्टाच्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्यात येणार आहे.






















