Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारींचं मोदींना राजीनामापत्र, पदमुक्त होण्याची इच्छा

Governor Bhagat Singh Koshyari : भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन दूर करावं, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्यभरात विरोधकांनी रान उठवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी विरोधकांनी राज्यपालांची मागणी केली होती. त्यातच आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola