'राजकीय पक्षाचे लेबल बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी एकत्र येऊया',समरजितसिंह घाटगे यांची विशेष मुलाखत
मराठा समाजाला आरक्षण देण्याची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नियत नाही.60 वर्षे राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही, असा सवाल शाहू जनक घराण्याचे समरजितसिंह घाटगे यांनी केलाय. मराठा आरक्षणाच्या बाबतीत गायकवाड आयोगाच्या आधी 6 आयोग नेमण्यात आले होते. त्या आयोगांनी मराठा समाज मागास नाही असा अहवाल त्यावेळी दिला होता.
त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केला असता तर आज ही वेळ आली नसती. त्या सहा आयोगाचे म्हणणे आणि गायकवाड आयोगाचे म्हणणे याचा विचार कोर्टात करण्यात आला. गायकवाड आयोग कोणत्या मुद्यावरून मराठा समाज मागास आहे म्हणतात ते पटवून द्यायला राज्य सरकार कमी पडले आहे. हे सगळं महाविकास आघाडी सरकारने जाणूनबुजून केलं असल्याचा आरोप देखील समरजित घाटगे यांनी केलाय.






















