Devendra Fadnavis : 25 वर्षांत मुंबईसाठी काय केलं ते सांगा - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : 25 वर्षांत मुंबईसाठी काय केलं ते सांगा - देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या मुंबई भेटीत उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि वायव्य मुंबईमधल्या कार्यकर्त्यांसाठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. अंधेरीतल्या या संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कठोर टीका केली. २५ वर्षांत तुम्ही मुंबईकरांसाठी केलेलं एक काम दाखवा, मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड करण्यासाठी आम्हाला सत्तेत यावं लागलं, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरेंचा समाचार घेतला. धारावीचा पुनर्विकास देखील आम्हीच करत आहोत, या शब्दांत फडणवीसांनी ठाकरे गटाचा समाचार घेतला.



















