Ajit Pawar Home quarantine | अजित पवार होम क्वॉरन्टाईन, थकवा जाणवत असल्याने निर्णय
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित होम क्वॉरन्टाईन झाले आहेत. सुदैवाने त्यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. परंतु थकवा जाणवत असल्याने अजित पवार यांनी क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला. तसंच आजच्या नियोजित बैठकाही रद्द केल्या आहेत. कालही त्यांनी मंत्रालयातील सर्व बैठका रद्द केल्या होत्या.
गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी चर्चा रंगल्या होत्या. अजित पवारांना थोडा ताप असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती, ती निगेटिव्ह आली आहे. परंतु थकवा जाणवत असल्याने अजित पवार घरीच आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या























