Lonavala जवळ Daund - Indore Express चे डबे रुळावरुन घसरले, Mumbai Pune रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत?
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात झालाय. इंदोर दौंड या रेल्वेच्या दोन बोगी रुळावरून घसरल्या आहेत. लोणावळा रेल्वे स्टेशन जवळ पावणे आठ वाजता ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईहून पुण्याला ही रेल्वे निघाली होती, तेंव्हा लोणावळा स्टेशनवरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबताना अचानक बोगी घसरल्या. रेल्वेच्या मागच्या बाजूच्या या दोन्ही बोगी होत्या, त्यात प्रवासी देखील होते. पण थांबविण्याच्या उद्देशाने रेल्वेचे स्पीड कमी केल्याने मोठी दुर्घटना टळली. सर्व प्रवासी सुखरूप असून वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. रेल्वेतील सर्व प्रवाश्यांना लोकलने पुण्याला रवाना करण्यात आलंय. हा अपघात कशामुळे घडला याचं परीक्षण रेल्वे विभागाकडून सुरू आहे.























