Congress Action on Ashish Deshmukh : काँग्रेस शिस्तपालन समितीकडून आशिष देशमुखांना कारणे दाखव नोटीस
Congress Action on Ashish Deshmukh : काँग्रेस शिस्तपालन समितीकडून आशिष देशमुखांना कारणे दाखव नोटीस
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत आमदार आशीष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबतच्या वादग्रस्त वकतव्यांप्रकरणी देशमुखांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची बैठक आज मुंबईत पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीसाठी भालचंद्र मुणगेकर, उल्हास बापट उपस्थित होते, तर काही वरिष्ठ नेते हे बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते. आशीष देशमुखांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पटोलेंना महिन्याला एक खोका दिला जातो असा खळबळजनक आरोप देशमुखांनी नुकताच केला. पटोले हे सुरतला होते, तो संदर्भ साधून ते लवकरच गुवाहाटीलाही जातील, असंही वक्तव्यही देशमुखांनी केलं.

















