Bhandara Hospital Fire | मुख्यमंत्री आज दूर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पाहणी करणार
भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) काल मध्य रात्री लागलेल्या आगीमुळे 10 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. राज्य सरकारने तातडीने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
या सर्व प्रकरण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता भंडारा जिल्ह्यातील दूर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. तसेच नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करून त्यांना दिलासा देणार आहेत.
दुपारी 12 वाजता ते भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. यानंतर ते नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करुन त्यांना दिलासा देतील.



















