City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCity 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 | ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक, रात्री आठ वाजता सहयाद्री अतिथीगहावर होणार बैठक. सर्व आमदार आणि मंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना.
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन, देविगिरी या त्यांच्या निवासस्थानी होणार स्नेहभोजनाचा कार्यक्रम.
ठाकरे गटाचं मुंबईतल्या विविध भागात आंदोलन, 'जुन्या चाळी, झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना वीज बिलामध्ये सवलत द्या, ठाकरे गटाची मागणी
300 युनिट पर्यंत वीज बिल माफ करावं तसंच महावितरणनं केलेल्या वाढीव अनामत शुल्काच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं आंदोलन. वाशी येथील महावितरण कार्यालयाबाहेर केलं आंदोलन.
पुणे जिल्ह्यातील अनेक धबधबे पर्यटकांसाठी बंद, लोणावळा आणि ताम्हिणी मधील घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय, भीमाशंकर अभयारण्यातील सर्व निसर्गवाटा सुद्धा बंद.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर लोणावळ्यात कारवाईचा बडगा, भुशी धरण परिसरात पर्यटनाला अडसर ठरणारी छोटे हॉटेल, फेरीवाले, चना-चाट विक्रेत्यांवर ही कारवाई.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी एकूण १४ उमेदवारी अर्ज दाखल, भाजप ५, शिवसेना २, राष्ट्रवादी २, ठाकरे गट १, काँग्रेस १, शरद पवार गटाचा जयंत पाटलांना पाठिंबा तर दोन अपक्ष उमेदवारांकडूनही अर्ज दाखल.