Osmanabad : तुळजाई मंदिरात Chhatrapati Sambhaji Raje यांचा अवमान, मंदिर संस्थान कडून गैरवर्तन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राची आदिमाया आदिशक्ती आई श्री तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी वरदायिनी असल्याने छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील शभवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. काल संध्याकाळी 9 वाजता दरम्यान युवराज संभाजीराजे छत्रपती आले होते यावेळी मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून प्रतिबंध केला गेला. सरकारी नियम दाखवत महाराजांना मंदिरातील सिंह गाभारा जवळ जाण्यापासून रोखले. राजेंनी आपल्या घराण्याची परंपरा आपल्याला पाळू द्या, अशी नम्र विनंती करून देखील त्यांना आतमध्ये प्रवेश करू दिला गेला नाही.मंदिरातीळ कंत्राटी पध्दतीने कामावर असलेल्या अन मंदिर प्रशासनातील कर्मचारी यांनी गैरवर्तन केले.