Cheetah Hunting : आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये केली पहिली शिकार

Continues below advertisement

आफ्रिकेहून आणलेल्या चित्त्यांपैकी दोघांचा विलगिकरणाचा काळ संपल्यानंतर त्यांना मध्य प्रदेशातील  कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलं होतं..
हे दोघे आता इथल्या वातावरणाशी जुळले असून त्यांनी 24 तासाच्या आत  पहिली शिकार केलीये..  चित्ता आता शिकार करून स्वतःच्या भोजनाची व्यवस्था करू शकतात, पण त्यांना गरज पडल्यास भोजन पुरवलं जाईल अशी माहिती मुख्य वनसंरक्षक उत्तमकुमार शर्मा यांनी  दिलीये..  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशमधील कुनो या नॅशनल पार्कमध्ये ८ चित्ते आणले होते. या चित्त्यांना एका छोट्या आवारात ठेवण्यात आलं आहे. आठपैकी दोन चित्त्यांना रविवारी मोठ्या आवारात सोडण्यात आलं. पहिल्याच दिवशी त्यांनी खुल्या जंगलात तुफान मस्ती केली. तसंच, हरिण आणि सांभर यांच्या मागे दौड लावली. यावेळी हरणाची शिकार करण्यास चित्त्यांना यश आलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram