Shinde Group Will Go to Guwahati : शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यासाठी गुवाहाटीत हॉटेलचं बुकिंग आणि अन्य तयारी पूर्ण झालीय. राज्यातील सत्तांतराच्या आधी जे राजकीय नाट्य घडलं तेव्हा शिंदे त्यांच्या समर्थकांसह गुवाहाटीमध्ये गेले होते. त्यावेळी तिथून निघण्याआधी त्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. त्यांचं मिशन पूर्ण झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे आमदार कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत.